अनेकदा असं होतं की आपण शाळेत शिकत असताना आपल्याला काही भाग कंटाळवाणा वाटतो. त्याची कारणं अनेक असतात. ते शिकून त्याबद्दल कोणाला सांगितलं तर कौतुक होण्यासारखं नसतं. "जॅक अँड जिल' म्हणणा-या लहानग्याचं कौतुक होतं. मराठी बाराखडी म्हणणा-याचं कौतुक होत नाही. अनेकदा शिकवणारा शिक्षक कंटाळवाणा असतो किंवा त्यालाच आपण काय शिकवतोय ते आवडत नसतं. किंवा आपलं लक्ष इतर खेळांमध्ये आणि खुणावणाऱ्या असंख्य आकर्षणांकडे जास्त असतं. बऱ्याचवेळा आपण जे शिकायचा कंटाळा केलेला असतो त्याचं महत्त्व आपल्याला मोठेपणी कळतं. आपण लहानपणी थोडं जास्त लक्ष द्यायला हवं होतं असं वाटत राहतं.
ज्यांना आपल्या मराठी भाषेच्या मुळाक्षरांबद्दल पुन्हा जाणून घ्यायचं असेल किंवा आपल्याला काय माहीत नाही हे समजून घ्यायचं असेल, किंवा आपल्या इंग्रजी माध्यमातल्या मुला-नातवंडांना माहिती देण्यासाठी संदर्भ साहित्य हवं असेल तर त्यांच्यासाठी नीलेश सावरगावकर ह्यांचा लेख येथे उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment