Friday, July 22, 2011

अनंताची आरती Arati Anantachi

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।

नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।

अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।

रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।

मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

2 comments:

  1. Hi,

    Hi aarti aamchya kade anantachya pujela darvarshi mhanato....... aani aamhi pidhi dar pidhi aikun aikun bolat aahot...... Nice to see it online. Do you know the source of it?

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
    एका जुन्या आरतीसंग्रहात ही आरती सापडली. अनेकजण ह्या आरतीविषयी चौकशी करीत असत म्हणून मी ती पोस्ट केली. वासुदेव मोरेश्वर नावाच्या कवीची ही रचना आहे असे शेवटच्या चरणावरून दिसते. अनंतचतुर्दशीला ही आरती मी ऐकलेली आहे. चालीसाठी खरे तर ऑडिओ फाइलही अपलोड करायला हवी.

    ReplyDelete

Popular Posts