शैक्षणिक गुणवत्ता म्हणजे काय?
अनेक विकसनशील देशांमध्ये, विशेषतः "दुसऱ्या' जगातील देशांमध्ये चर्चेत असलेला हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन असलेला लेख येथे वाचता येईल.
अंदाजपत्रकातील तरतुदी, शिक्षकभरतीचे धोरण, अभ्यासक्रम, भाषाशिक्षण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या कलानुसार त्यांचे शिक्षणशाखांमध्ये वर्गीकरण, शैक्षणिक व्यवस्थापन, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, शिक्षणसंस्थेचा परिसर, शिक्षकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण अशा विविध शिक्षणविषयक बाबींचा विचार त्यामध्ये येतो.
ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही स्वयंसेवी संस्थांनी आपल्या कामाची दिशा नक्की करण्यासाठी ज्या चार महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे ठरवलेले आहे, ते प्रश्न असे आहेत -
1. आपल्या विद्यार्थ्यांनी काय शिकावं असं आपल्याला वाटतं?
2. विद्यार्थ्यांनी ते शिकून आत्मसात केलेलं आहे का हे आपल्याला कसं कळेल?
3. विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केलेलं नसेल तर आपण काय करणार आहोत?
4. ज्या विद्यार्थ्यांनी हे आत्मसात केलेलं आहे त्यांना आणखी सखोल ज्ञान देण्यासाठी आपण काय करणार आहोत?
शासकीय स्तरावरून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्याला प्रचंड विरोध होतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. कॅनडामधील काही राज्यांनी केलेला शैक्षणिक गुणवत्तेचा कायदा वादग्रस्त ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शालांत परीक्षा मंडळांवर गुणवत्तेच्या प्रश्नासाठी नियंत्रण ठेवणारे मंडळ आहे. परंतु त्याला मर्यादित यश मिळालेले आहे. महाराष्ट्रातील उचपदस्थ शैक्षणिक अधिकाऱ्याने वैफल्यग्रस्त होऊन दिलेला राजीनामा हे एक ताजे उदाहरण आहे. (चौथीमध्ये गुणवत्ता प्रमाणक अशी सार्वत्रिक परीक्षा घेण्याचा प्रयत्न ह्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली झालेला होता.)
चीनमध्ये ह्या प्रश्नावर लक्षणीय संशोधन झालेले आहे व ह्या दिशेने त्या देशाला मिळालेले यश लक्षणीय मानले जाते.
No comments:
Post a Comment