शैक्षणिक गुणवत्तेची व्याख्या कशी करतात?
शैक्षणिक गुणवत्तेची ठोस व्याख्या करता आलेली नाही. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याशी सामाजिक उद्दिष्टे, सर्व पातळ्यांवरील निर्णयप्रक्रियेतील सहभागाचे स्वरूप असे मूलभूत प्रश्न निगडित आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेच्या बहुआयामी विचारामध्ये पुढील पाच अंगांचा समावेश आहे :
1. अभ्यासक्रम
2. शिक्षकांची भूमिका
3. शाळेची संरचना
4. मूल्यनिर्धारण आणि देखरेख
5. स्रोत
ह्या पाचही गोष्टींची गुणवत्ता अंतिमतः शैक्षणिक दर्जा ठरण्यासाठी कारणीभूत होते. भारतामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या व्यवस्थेत अभ्यासक्रम फारच साचेबंद झाला आहे (किंबहुना ठराविक क्रमिक पुस्तके म्हणजे अभ्यासक्रम असा समज शिक्षकांनी करून घेतलेला आहे). शिक्षकाचे एकूण उत्पन्न आणि नाममात्र उत्पन्न ह्यातील फरक कमी झालेला आहे, म्हणजेच त्याचे "खरे' उत्पन्न कमी झाल्याने आपल्या पेशात त्याला स्वारस्य उरलेले नाही. शाळेची संस्थात्मक संरचना पुरेशी लवचिक नसल्याने नवीन बदलांचा स्वीकार करणे अवघड होत आहे. मूल्यनिर्धारण आणि देखरेख हे केवळ उपचार ठरत आहेत. शिक्षणाची जी काही गुणवत्ता अजून शाबूत आहे ती केवळ पारंपारिक स्रोतांच्या जोरावर टिकून आहे. नव्या स्रोतांची निर्मिती आवश्यक त्या वेगाने होत नसल्याने जुन्या स्रोतांना कवटाळणारे शिक्षण पुरेसे प्रागतिक होऊ शकत नाही. ह्या साऱ्यामुळे गुणवत्तेची घसरण, त्यामुळे स्पर्धात्मकता कमी, त्यामुळे अपयश, सतत येणाऱ्या अपयशाने अनास्था व अनास्थेमुळे गुणवत्तेची आणखी घसरण असे हे दुष्टचक्र आहे.
Great work man.. i m lovin it..
ReplyDeletemazyatla marathi manu jaga zhala..