सामान्यतः कोणत्या ढोबळ निकषांनुसार संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन केले जाते?
सामान्यतः सोप्या भाषेत हे निकष असे सांगता येतील :
- अभ्यासक्रमाची खोली आणि तो राबवण्यातील कार्यक्षमता
- शिक्षक : विद्यार्थी गुणोत्तर
- स्वीकारार्हता किंवा मागणी : एका जागेसाठी येणा-या अर्जांची संख्या
- किती विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करतात ( टक्केवारीपेक्षाही केवळ संख्या महत्त्वाची)
- शाळेतून/संस्थेतून बाहेर पडल्यावर विद्यार्थ्यांची भविष्यात होणारी प्रगती
- ग्रंथालय सुविधा
- प्रयोगशाळा सुविधा
- संगणक सुविधा
- संस्थेची जनमानसातील प्रतिमा / प्रतिष्ठा
- शिक्षकांची गुणवत्ता
- स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे यश
- संस्थेला मिळणा-या देणग्या
- संस्थेची स्रोतसमृद्धि
- कर्मचा-यांच्या मनातील प्रतिमा
- आत्मशोधनासाठी उत्पादकता संशोधन
- इतर संस्थांसाठी सल्लासेवा देण्याची क्षमता
No comments:
Post a Comment