Thursday, December 20, 2007

पुस्तकचौर्य आणि मनाचं औदार्य

पुस्तकं चोरणं हा चोरीचा प्रकार वरकरणी शिष्टसंमत नसला तरी आवडीची पुस्तकं ढापण्याच्या मोह भल्याभल्यांना होतो. चोरणाऱ्यानं पुस्तकांची काळजी घेतली तर ठीक नाहीतर ती पुस्तकं रद्दीत जाण्यासारखं दुसरं पाप नाही. धर्मवेडापायी वाचनालये जाळणारे लुटारू आपल्या देशाने पाहिलेले आहेत. पण पेरू देशाचे लोक त्यामानाने सुदैवी दिसतात. 120 वर्षांपूर्वी त्यांची पुस्तके चिली देशातील सैनिकांनी पळवली.

पण ही कथा तिथेच थांबत नाही. 120 वर्षे जतन करून ही पुस्तके आता चिली देशाने पेरूला परत केली आहेत !

त्यामागचं कारण राजकीय आहे. दोन्ही देशांमधील सरकारांना वैमनस्य कमी करायचं आहे. त्यासाठी ही प्रतीकात्मक कृती होती. कारण काहीही असलं तरी अशी आश्चर्यकारक गोष्ट घडू शकते याचंच अप्रूप पुस्तकप्रेमींना वाटतंय.

सविस्तर माहितीसाठी ही बातमी वाचा.

No comments:

Post a Comment

Popular Posts