Thursday, December 20, 2007

ज्ञानलालसा

This is what Montaigne has to say about our mania to perpetuate the things pleasurable, including knowledge:

"We are all of us richer than we think we are; but we are taught to borrow and to beg, and brought up more to make use of what is another's than of our own. Man can in nothing fix himself to his actual necessity: of pleasure, wealth, and power, he grasps at more than he can hold; his greediness is incapable of moderation. And I find that in curiosity of knowing he is the same; he cuts himself out more work than he can do, and more than he needs to do: extending the utility of knowledge, to the full of its matter''

हे खरं असलं तरी ""अनंत अमुची ज्ञानासक्ती...'' असं म्हणत आपली ज्ञानलालसा जोपासणाऱ्या माणसांना, विशेषतः मराठी माणसांना अजून विशेष ज्ञात नसलेली माहिती मला द्यायची आहे.

मराठीत अनेक विद्वान असले तरी आधुनिक काळात मराठी भाषक अभ्यासकांची वानवा आहे "असेच खेदाने म्हणावे लागेल.' अन्यथा ज्ञानकोशकार केतकरांची परंपरा पुढे चालवणाऱ्या विद्वानांनी साकारलेला मराठी विश्वकोशाचा मोठा प्रकल्प असा वाऱ्यावर सोडायचा धीर महाराष्ट्र शासनाला झाला नसता.

पण आता मराठी ज्ञानकोश मराठी विकिपीडियाच्या रूपाने येथे साकार होताना पाहून मोठाच दिलासा मिळालेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या रूपाने प्रादेशिक भाषांना संजीवनी मिळेल हे भाकीत आता खरे ठरेल असे वाटू लागलेले आहे. मराठीप्रेमींनी ह्या ज्ञानाकोशासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यास हात आखडता घेतला तर आलेली एक सुवर्णसंधी निसटून जाईल.

No comments:

Post a Comment

Popular Posts