इंटरनेटवर चांगलं वाचायला बरंच काही आहे पण ते सहजासहजी सापडतंच असं नाही. एखादा वाचनीय लेख सापडला की म्हणूनच बरं वाटतं. Waving Goodbye to Hegemony हा पराग खन्ना ह्यांचा लेख असाच वाचनीय आहे. मोठा आहे, पण वेळात वेळ काढून वाचावा असा आहे. जगामध्ये एक नाही तर तीन राजकीय ध्रुव निर्माण झाले असल्याचा सिद्धांत लेखात मांडलेला आहे. ज्याप्रमाणे भारतात प्रादेशिक पक्षांना महत्त्व आलेले दिसते तसेच जागतिक स्तरावर "दुसऱ्या' जगातील राष्ट्रांना महत्त्व कसे आले आहे ह्याची हकीकत सांगितलेली आहे.
युएसमधील प्रसिद्धिमाध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या काही विचारवंतांनी देशासमोरील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी न्यू अमेरिका फाऊंडेशन स्थापन केलेले आहे. http://www.newamerica.net/ या त्यांच्या साईटवर बराच वाचनीय मजकूर आहे.
ब्लॉग म्हणजे काय हे आता बहुतेकांना माहीत झाले आहे पण डायव्हिलॉग म्हणजे काय? व्हिडिओ डायलॉग. ह्या दृक्श्राव्य संवादांचा आनंद घेण्यासाठी साईट आहे -http://bloggingheads.tv/diavlogs/
मराठी ई-लेखन वाचायचं असेल तर मनोगत ही साईट अवश्य पहावी. थोडी वात्रट-थोडी सिरियस साईट हवी असेल तर मिसळपाव चांगली आहे.
No comments:
Post a Comment