Sunday, February 17, 2008

कुत्र व्रजामो वयं...

बापूंनी माझं एक पुस्तक काल मला परत दिलं. ""सदाचार-चिंतनी'' हे अनाथ विद्यार्थी गृहाच्या डॉ. ग. श्री. खैर ह्यांचं ते पुस्तक आहे. सातवीमध्ये माझा पहिला नंबर आल्याबद्दल मला ""दहिसर सेवा समाज तरफथी'' मिळालेलं.

हे पुस्तक म्हणजे डॉ. खैर ह्यांची वैचारिक डायरी आहे. आपल्या विचारांचा आल्बम असावा असा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. (आज त्यांनी नक्की एखादा ब्लॉग लिहिला असता.) आपण आपले फोटो आल्बममधून पाहताना जशी आपल्यातील स्थित्यंतरे आपल्याला मोहवतात तसे वैचारिक बदल, स्थित्यंतरे आपल्याला नंतर पाहायला आवडतील असा तो विचार आहे.

ह्या पुस्तकामुळे बऱ्याच पूर्वस्मृती जाग्या झाल्या. अशीच पुस्तके कोणाकोणाला मिळालेली होती ते आठवले.

ते दिवस आठवले की आपण स्वतःला पार विसरून गेल्याचे जाणवते. त्या दिवसांची कमाई आता केवळ काही मित्रांच्या मैत्रीच्या स्वरूपात शिल्लक आहे. अजूनही हे मित्र ओळख दाखवतात. They respect me for what I had been...not for what I am...

ज्ञाताच्या साहाय्याने मनाला stimulate करण्यातला फोलपणा आता जाणवतो. "बाह्य भैरवीच्या प्रीतीला' प्रतिसाद देणारं वेडं मन आपला निरागसपणा केव्हाच घालवून बसलंय. त्या विश्वातून मी आता तडीपार झालेलो आहे. माझ्या नव्या व्यावसायिक विश्वात ती credentials आता चालत नाहीत. आताच्या जगात असं झालंय की
"Unless you kill, they won't yell murder!''

No comments:

Post a Comment

Popular Posts