Sunday, February 17, 2008

Self Consumption

Economics मध्ये बऱ्याचवेळा self consumption हा विचार येतो. उत्पादनाचा जो भाग उत्पादक स्वतःसाठी वापरतो त्याला self consumption म्हणायचे. उत्पादनाचा पसारा जसा वाढवावा तसे हे self consumption वाढत जाण्याची शक्यता बरीच जास्त असते.
आपल्यामधील Nacissism हा एक self consumption चाच प्रकार आहे. आपल्या इमेजची चटक आपल्याला लागली की हा प्रकार बळावतो. तांदूळ जास्त पिकला की तो कुजवून त्याची दारु करून पिण्याकडे प्रवृत्ती वाढते. Overproduction अनेकदा नशेला कारणीभूत होते. जास्त पीक आले की पडत्या भावाने विकावे लागते - ते परवडत नाही. मग self consumption वाढवायचे.
Use आणि consumption ह्यातला फरक चटकन उमगत नाही. Use हा निर्मितीसाठी असतो consumption मात्र निर्मितीसाठी नसते - ते तृप्तीसाठी असते.
Assets च्या liquidity चे आणि durability चे संतुलन साधता आले की consumption मध्ये moderation आणता येते.

1 comment:

Popular Posts